Powered by Blogger.

Pages

Wednesday, August 17, 2011

" यशाचा मंत्र "

  Rajendra Todkar       Wednesday, August 17, 2011
आयुष्याची वाट कधी सरळ कधी बिकट
अनुभवांचा साठा काही गोड काही तिखट
जीवनाच्या स्मृती काही ठळक काही फिकट
मित्रांचे स्वभाव काही उदार काही चिकट

आयुष्यातील विविधतेने रंगत येते भारी
पाची बोटे वेगवेगळी किमया त्यांची न्यारी
अपयशाला चाखल्याशिवाय यशाला गोडी नाही
दुख्खानंतर सुखासारखे बक्षीस नाही काही

वाटेतील काट्यांचे कोणी बाळगू नये भय
हिम्मत आणि प्रयत्नांनी मिळवावा विजय
प्रबळ इच्छाशक्ती करते परिस्थितीवर मात
ध्येयाच्या वाटेवर आले जरी समुद्र  सात
logoblog

Thanks for reading " यशाचा मंत्र "

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment